माझ्या इच्छांची दुनिया
माझ्या इच्छांची दुनिया
माझ्या इच्छांची दुनिया आता
केली मी माझ्यापुरती मर्यादित
म्हणुनच आजकाल आनंद माझा झाला व्दिगुणित..
दुसऱ्यांसाठी सर्वकाही करता करता
मग त्यांच्याच कडुन काही इच्छा ठेवून झुरता झुरता..
दुसऱ्यावर लादुन आपल्या इच्छा आकांक्षा
मर्यादितच राहिल्या माझ्या कक्षा..
सोडले मी इच्छांनी भरलेल्या स्वप्नांच्या दुनियेत रमणे
कारण हळुहळू शिकते आहे मी
माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे..
