घर..
घर..
चार भिंती,एक छप्पर,
एक खिडकी दोन दार
जमुन आले एकत्र
तुमचे,आमचे, प्रत्येकाच्या स्वप्नांचे
जुळुन येते का हो घर..
घर केवळ घर नसावं
जुळुन आल्या भिंती
तरी.. जगण्यासाठी
विणलेलं ते एक स्वप्न असावं..
मोकळ्या अंगणात बहरलेल्या तुळशीचे
देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाचे
खिडकीतून प्रकाश आणणाऱ्या तावदानाचे
ताई,वहिनीच्या मनमोकळ्या हसण्याचे
बाबांच्या कडक शिस्तीचे
आईच्या मायेचे.
घर असावे इवलेसे
पण प्रेमाने थाटलेले
सुख दुःख सारे काही एकत्र वाटलेले..
