चौकट..
चौकट..
चौकटीच्या पलीकडेही आभाळ मोकळं असतं
आईपणाच्या पलीकडेही बाईपण थोडं असतं..
बांधुन घेतलेलं ते.तुच एक वेसण असतं
स्वतः हुनच चढवुन घेतलेलं जबाबदारीच कोंदण असतं..
आपल्याला स्वतः मधुन वजा करुन जग नक्कीच नसतं..
सर्व सांभाळुनही स्वतः साठी वेळ काढता येतो
पण कळत नाही की,तुला यात चुकीचं ते काय वाटतं..
उभा जन्म फक्त आपल्यांसाठी करता करता
कधीतरी आपल्यासाठीही नक्कीच जगता येतं..
त्यातही मात्र तुला अपराध्या सारखं वाटतं..
स्वच्छंदी मन आणि हातांचे करुन बघ जरा पंख
कारण चौकटीच्या पलीकडेही आभाळ मोकळं असतं..
