हिशोब..
हिशोब..
लहानपणी गणितात ती जरा कच्ची होती
सोडवतांना अचुक गणित नेहमीच तिची धांदल होती
तेव्हा पासुनच ती हिशोब मांडण्यात कमी होती..
जरा मोठी झाल्यावर आकडेमोड कशीबशी करत होती
जुळवाजुळव करता करता दमछाक होत होती
तेव्हा पासुनच ती हिशोब मांडण्यात कमी होती...
नकोच मग हिशोब कसलाच कंटाळा ती करत होती
गणित स्वतः चेच सोडवायचे आता ती नकोच म्हणत होती
म्हणूनच आपल्याच माणसांनी तिच्या आयुष्याचा हिशोब चुकवला होता
कारण काय तर ती हिशोब मांडण्यात कमी होती..
आयुष्य सुद्धा एक गणितच आहे हळूहळू समजत होती
नात्यांची गोळा बेरीज मात्र चोखपणे करत होती
समोरचे कितीही चुकले तरी हिशोब त्याचा ठेवत नव्हती
आधीपासूनच ती हिशोब मांडण्यात कमी होती..
हळूहळू तिच्या आयुष्याचाच हिशोब लागला होता
चुकलेले हिशोब खोडु कसे
आयुष्यातील महत्त्वाचे पान फाडु कसे
म्हणता म्हणता समोरच्याने दिलेले हिशोब
आता ती खरे मानत होती
कारण
हिशोब मांडण्यात ती कमी होती...
