मुलं मोठी होतांना
मुलं मोठी होतांना
1 min
145
सुरवंटाचं पाखरु उडु लागलं आभाळी
सुनं झालं अंगण, सुना झाला व्हरांडा...
घरातील पिलांना जपावं आयुष्यभर
पंखात भरावं बळ ..
उडावं त्यांनी पंख पसरून
कवेत घ्यावं आकाश..
यश नावाच्या क्षितीजावर टेकावे
आपले हात...
कितीही उंच उडाली पिलं
पाखरं बनुन..
आपलं मन मात्र
तिथेच घुटमळतं सुरवंटावर
पाखरासाठी...
