नजर..
नजर..
नजरेत सामावलेल्या स्वप्नांना
मोकळं आकाश मिळावं
नजर पोहचेल इतकं उंच उडावं
नजरेत व्यापलेलं आकाश कवेत घ्यावं
नजरेत आपल्या सारं जग दिसावं
नजर झुकावी त्या प्रत्येकाची खाली
ज्याने आपल्या नजरेला कमजोर समजले
त्याच स्वप्न भरल्या नजरेने आपल्याला दृष्टिकोन दिला
हे आपल्या यशाची चमक पाहणाऱ्या प्रत्येक नजरेला कळावे
