चिमणी
चिमणी
चिऊ चिऊ चिमणी
येते माझ्या अंगणी
देते तिला मी दाणापाणी
गाते ती गोड गोड गाणी...
अंगणात त्यांचा चिवचिवाट फार
टिपतात दाणे इवल्याशा चोचीने
खूप सार्या चिमण्यांचा थवा
उडायचा फारच घाईने....
अंगणी चिवचिवाट चिमण्यांचा
आणि घाई आमची आवरायची
चिऊताईंची गंमत पाहत मग
वाट धरायचो आम्ही शाळेची....
आईने दिलेले दाणापाणी
आम्ही चिऊच्या पुढे ठेवले
चोचीने छान टिपताना पाहिले
तिने पिलांच्या मुखी भरविले...
गोजिरवाण्या या चिऊताईला
आपण अंगणात चारापाणी ठेवूया
संख्या चिऊताईची सारे मिळून
वाढवण्याचा प्रयत्न करूया....
चिमणी राहिल सुरक्षित आता
घरटी पण झाडावर बांधूया
एवढेतरी आपण निश्चितच करूया
प्राणीमात्रांची सर्वजण काळजी घेवूया....
