क्रांतिकारी हुतात्मे
क्रांतिकारी हुतात्मे
तेवीसच्या त्या कातरवेळी गुंजली एकच वाणी
इन्कलाब झिंदाबाद म्हणत वाघ चढले हो सुळावरी
नाही घेतली भीक दयेची भ्रष्ट अमानुष सरकार सामोरी
इन्कलाब झिंदाबाद म्हणत वाघ चढले हो सुळावरी...
देशाच्या जनतेला सांगूनी गेले मंत्र हाच धरा की
देश, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी उचला आता समशेरी
इंग्रजांच्या बहिऱ्या सरकारला उठवा आता तांडव नाद करुनि
इन्कलाब झिंदाबाद म्हणत वाघ चढले हो सुळावरी...
अनन्वित अत्याचार करणाऱ्यांना दाखवून द्या जागा त्यांची
आठवा कुर्बानी थोर मंगल पांडे, चापेकर बंधू, लालजी आणि अनेक क्रांतिकारकांची
घडवा रक्तरंजित इतिहास करुनि कत्तल त्या हैवानांची
इन्कलाब झिंदाबाद म्हणत वाघ चढले हो सुळावरी...
मातृभूमीच्या रक्षणासाठी झुंजले ते अखेरपर्यंती
होऊनि हुतात्मे सोपवला देश आपल्या हाती
आता आहे वेळ आपल्या कर्तृत्वाची
करूया मेहनत, घडवू प्रगती, करु उज्ज्वल शान तिरंग्याची
भाग पाडू समस्त जगास घेण्यास दखल भारतभूमीची...
तेवीसच्या त्या कातरवेळी गुंजली एकच वाणी
इन्कलाब झिंदाबाद म्हणत वाघ चढले हो सुळावरी...
