व्यथा नव्हे, स्त्रीशौर्याची गाथा
व्यथा नव्हे, स्त्रीशौर्याची गाथा


सालाबदापरमान आता बी पाळणा हालणार ,
आता बी नशिबी परत पोट्टीच जनामणार?
पोरायाची वाट पायता पायता रंग पोरीइची लागली,
दाद्ल्यान या वक्ताला पोराचीच मागणी केली!
म्हणे तो या वक्ताला पोरगाच व्हईन
नाय झाला, तर तुला घराबाहेर काढीन!
मागल्या वाक्तालाच बोलली होती दाक्तरीन
बस झालं आता करून टाक आपरीशीन!
हालततुही पाय आता, पाय आता नाही तुयात तरान,
कशापायी उठाठेव पोट्टा-पोट्टी एकसमान!
पोरगा-पोरगी नसते म्हणी ती बायकाईच्या हातात,
ते समद असतं माणसाच्या गुण सुतरात!
मला सार पटल, पण दादल्याला कोण सांगणार?
p>
नाशिबसंग आता आपल्या आपल्यालाच भांडावं लागणार!
म्हणून तर देवा तुला इनंती करते,
पोरगी झाली या वक्ताला तर हिम्मत मांगते!
घेऊन पोरीईला घराबाहेर पडीन,
चांगलं शिकून लई मोठ्ठ करीन!
लक्षात आहे मपल्या सिंधुताई सपकाळ,
आपल्या पोरीसकट केला दुसऱ्या लेकरांचा सांभाळ!
सिंधुतैकडे पाहून एकच वाटते,
विच्छाशक्ती असेल,तर काय बी कठीण नसते!
प्रेरणा त्यांची घेऊन मी लई मेहनत करणार,
मपल्या भी पोरी आता शिकून मोठ्या होणार!
घाबरू नका पोरीइनो, नका आणू डोयात पाणी,
करीन तुमच्यासाठी हाडाचा मनी, अन रक्ताच पाणी!