STORYMIRROR

Vishalraje Bore

Inspirational

1.0  

Vishalraje Bore

Inspirational

बळीराजाची कहाणी

बळीराजाची कहाणी

1 min
27.8K


डोळ्यात पाण्याचा थेंब नाही मनातलेही ढग आटुन गेले,


आपल कुणीच नाही म्हटल्यावर फक्त हुंदकेच दाटून आले.


वचनांची फक्त खैरात होती, पण एकही त्यांनी पाळल नाही, 


बळीराजा एवढ तुम्ही, कुणालाच कधी छळल नाही. 


बळीराजाला सोडुन सर्वाना उत्पन्न येथे जाहीर झाले 


बळीराजा म्हणे जगाचा पोशींदा पण त्यालाच सारे विसरुन गेले. 


माळरानावर पलीकडे आता दिसत नाही हिरवं रान, 


गाई वासर कानात सांगतात मालक सोडू नका ना प्राण! 


दोष सरकारला देतच नाही आम्हीच खंबीर वागल पाहीजे, 


आपणच कमावन आपणच खाण हेच धोरण आखल पाहिजे, 


मुक्या जिवालाही समजते बळीराजाची सारीच कहानी, 


बळीराजा सोडुन सारेच मस्त,किती माणस झालीत ना शहानी!


गळफास, मरण सोडल आम्ही, चला ठणकाऊन सांगूया जगाला, 


बळीराजा आहे जगाचा पोशिंदा जो चालवतो या देशाला!


मदतीची गरजच नाही, अपेक्षाही नाही आम्हाला, 


पण भाव तरी द्या राजेहो, आमच्या रक्त आटलेल्या घामाला! 


आमच्या रक्त आटलेल्या घामाला! 







Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational