आत्मविश्वास
आत्मविश्वास

करोना तुझ्या तांडव नृत्याने कहर केला आहे.
काही संक्रमित होऊन मेले, तर काही रस्त्यावर आले आहे.
तुझी विनाश्काली प्रवृत्ती मी नष्ट करत आहे.
कारण डॉक्टर व पोलीस या दोन शस्त्रांनी मी तुझ्याशी लढतो आहे.
सफाई कर्मचारीसुद्धा या लढ्यात मागे नाही आहे.
त्यांचा जीव धोक्यात घालून स्वच्छ भारत अभियान चालवत आहे.
करोना तू थांब आम्ही तुझ्या चारी मुंढया करणार आहे.
कारण डॉक्टर व पोलीस या दोन शस्त्रांनी मी तुझ्याशी लढतो आहे.
या लढ्यात शिक्षकरुपी हत्यारही तेज झाले आहे.
न थकता न थांबता ज्ञानार्जनाचे कार्य अविरत ऑनलाईनद्वारे चालू आहे.
करोना तुझी दृष्ट मनोगते
कधीच फळाला येणार नाही आहे
कारण डॉक्टर व पोलीस या दोन शस्त्रांनी मी तुझ्याशी लढतो आहे.
तू जगाच्या अर्थव्यवस्थारुपी चाकाला खीळ बसवली आहे.
कर्तव्यनिष्ठ, कार्यरत मानवजात तू घरात बसवली आहे.
करोना, पण तरीही तुझ्याशी दोन हात करण्यास मी सज्ज आहे
कारण डॉक्टर व पोलीस या दोन शस्त्रांनी मी तुझ्याशी लढतो आहे.
तुझ्यामुळे सर्वच वाईट झाले आहे असे नाही आहे
माणसाने माणसाला माणुसकीचे दर्शन दिले आहे
करोना, तू कितीही विनाशकाली स्वप्न बघ तुला उतार तर देणारच आहे
कारण डॉक्टर व पोलीस या दोन शस्त्रांनी मी तुझ्याशी लढतो आहे.