जशास तसे
जशास तसे
माझ्या ग अंगणात पावसाचा सडा,
हिरव्या हिरव्या गालीचांचे डोंगर चढा !
हिरवे हिरवेगार चोहीकडे बघा,
नद्या- नाले, विहिरी भरल्यास तू रे ढगा !
देतात पाऊस आम्हा काळे काळे ढग,
तुमच्यामुळेच आमचे जीवन आनंदी बघ!
मानवप्राणी, पशुपक्षी येथे मुक्तपणे जगतात,
कारण सर्वांचीच पोटे इथे आनंदानी भरतात!
पण! पण!! पण काय?
काही दिवसांनी ऋतुचक्र फिरले,
पावसानी दडी मारून हिरवे गाव ओसाड झाले !
प्रत्येकाला जीवन जगणे होते आता कठीण !
पाणी पाणी करत होते मानव, प्राणी व जमीन!
सर्वांनाच वाटत होते आता पुन्हा पाऊस पडावा ,
गाव, शेत, डोंगर पुन्हा हिरवागार व्हावा !
पाऊस नव्हता म्हणून सगळीकडे उपासमार,
प्रत्येक मानव व प्राण्याला जीवनाचा झाला भार !
ढगाला जेव्हा सर्वांची विचारणा झाली,
का रे पावसाला तू अशी तंबी दिली?
ढग म्हणाले गडगडाट करून हसत.
तुमचाच दोष आहे, आता बसा रडत!
मी तिथेच बरसतो जिथे हवा लागते थंडी ,
तुम्हीच मानवाने झाडे तोडली जंगले केली भोंडी!
मग तुम्हीच सांगा मला थंड हवा कशी लागणार?
मी बरसून पाऊस कसा पडणार?
आता मानवांना त्यांची चूक कळली,
झाडे तोडणे तर सोडाच, पण त्यांनी नवीन झाडे लावली
हळूहळू ऋतुचक्र पुन्हा पालटत होते,
सोनियाचे दिवस आता पुन्हा येणार होते!!
