STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Inspirational

घटनेचे शिल्पकार

घटनेचे शिल्पकार

1 min
28.6K


घटनेचे शिल्पकार

आज माझ्याशी बोलले

हक्काच्या जानिवेचं

उद्बोधन मजला केले


अपुले संविधानात

सर्वाना समान केले

गुलामीला दूर सारून

अन्यायाला नष्ट केले


लोकशाही लोकात स्थापून

राजा केला प्रजेला

प्रजेवाचून श्रेष्ठ रुप

नसेल केव्हाही कुणाला


प्रत्येकाला उन्नत होवून

स्वाभिमान जागवावा

स्त्रियांनाही समानतेने

सन्मानीत करावा


धर्म जोपासावा मानवतेचा

धर्म निरपेक्षता जोपासावी

धर्म धर्मांना सन्मान देवून

सर्व सहिष्णुता बाळगावी


समाज बांधवांनो उठा

शिकून संघटीत व्हा

संघटनेच्या ताकतीने

अन्यायाशी संघर्ष करा


एकतेचा मूलमंत्र घेऊन

भारत आपला घडवूया

तळागाळातील लोकांपर्यंत

न्यायाचा मार्ग नेवूया


उज्वल भविष्यासाठी

अभ्यास दांडगा करावे

सर्वांच्या हक्कासाठी

अविरत काम करावे




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational