STORYMIRROR

Vivek Wanjari

Inspirational

4  

Vivek Wanjari

Inspirational

हे पार्था

हे पार्था

1 min
28.5K


हे पार्था

तू कशाचं सारथ्य करणार आहेस?

यशांचं

अपयशांचं

की, 

कर्तव्यांचं

जाणिवांचं

सत्याचं

तू योद्धा आहेस

पण तू माणूस सुद्धा आहे!

तूलाही पूर्णतः अपेक्षाविरहित जगता नाही ना येणार...

तरीही तू लढतोय प्रजेच्या,नैतिकतेच्या

मनोधैर्यासाठी...

तुझा एकत्र सांगावा करताना 

तू उदासीन असल्याचे शिक्के 

ओरखडयाप्रमाणे उमटतात...

मात्र कोण परिपूर्ण कधी असतं का?

सगळ्या चुका पोटात घ्यायला 

सगळेच आई सारखे असतात का?

            - विवेक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational