STORYMIRROR

yuvaraj jagtap

Inspirational

4  

yuvaraj jagtap

Inspirational

कविता:- "क्रांतिसूर्य"

कविता:- "क्रांतिसूर्य"

1 min
27.5K


समाजहिता साठी

तळपला सूर्य क्रांतीचा

जयजयकार शब्दसुमनांनी

ज्योतिरावांच्या जयंतीचा


समाजात घडविण्या क्रांती

पेटविल्या ज्ञान ज्योती

पेरली समाज मनात

समता, बंधुतेची नाती


अनिष्ट प्रथा,रुढींचा 

वाजवूनी तडाम ताशा

समाजात फुलविल्या

नव विचारांच्या आशा


वर्ण,जातीभेदाच्या 

अन्यायाला फोडीली वाचा

भेदाभेद मानणाऱ्या

समाजाचा बदलला ढाचा


अविध्येची करुनी फेड

स्त्री शिक्षणाची रोवली मेढ

समाजात असताना तेढ

मुलींच्या शिक्षणाचं घेतले वेढ


गुलामगिरीच्या तोडल्या बेड्या

हक्काचे सर केले शिखर

उचलुनी लेखणी गुलामगिरीवर

ओढीले आसूड प्रखर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational