STORYMIRROR

Varsha Dhainje

Inspirational

4  

Varsha Dhainje

Inspirational

"चिंध्यांची वाकळ"

"चिंध्यांची वाकळ"

1 min
28.8K


आठवणींचे गाठोडे उचकटताना

जुन्या चिंध्या पण अप्रूप वाटतात

नकळतपणे त्या आठवणी

गर्दीने पापण्यां दाटतात.


त्यावेळी या रंगीत नव्या होत्या

कितीदा नेसल्या तरी रोज रोज हव्या होत्या

दिवसेंदिवस यांचे धुणे झाले

काळ सरला तसे रंग जुने झाले.


आता यांना कुरवाळीता

ते क्षण पुन्हा आठवतात

क्षणभंगुर हिंदोळ्यावरुन

मनाला भूतकाळात पाठवतात.


ठरवलय आता एक मनाशी

या टाकुन नाही द्यायच्या

शिवायची छानशी वाकळ

अन वेड्या मनावर पांघरायला घ्यायच्या.


एवढचं उरलं या क्षणी हाती

कसे मानायचं यांना चिंध्या

हे तर खोल मनाच्या महासागरातील

शिंपल्यात दडलेले मोती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational