नारी शक्ती
नारी शक्ती
तुझी कहाणी, स्त्री जन्मा
बीज धारिणी, जननी,
अन्नपूर्णा, रणचंडी,
पत्नी, माता, तू भगिनी,
लक्ष्मीबाई, तू जिजाऊ,
हिरकणी, पन्ना दाई,
किती तुझ्या गाथा, व्यथा,
कशी करू उतराई!
कर पादाक्रांत मेरू,
तुला न कुणाची भीती,
तुझा सारा आसमंत,
तुझी सारी ही धरती!
कुणी बिभत्स खुडले,
गुल नाजुक म्हणूनी,
वरदान काट्याचे ही,
डंख कर तू रोषूनी!
नारी शक्तीस गौरवू,
तुझी आभाळाची माया,
यश तुझ्या हाती आहे,
तुजवर दैवी छाया!
