मराठी माझी सगुण
मराठी माझी सगुण

1 min

211
माय मराठी माझी सगुण,
नाकात नथ, डोक्यावर पदर,
भाळी कुंकू, गळी मंगळसुत्र,
सौभाग्यवतीचे रूप सुंदर!
अभिमान मराठी भाषेचा,
नसानसात भिनलेला फार,
साहित्य लेखणीची तडफ,
जणू मर्द मराठ्याची तलवार,
शाहिराच्या पोवाड्यात डफ,
ऐतिहासिक शब्दावर स्वार!
संतवाणीत जीवनाचे सार,
शब्दात दिसे आयुष्य आरपार!
लावणीत ती अशी श्रृंगारते,
ललितात भाव ओथंबतात,
नाट्यात छटा रंगतात,
काव्यरसात पद्य पाझरतात!
बाह्य रूप जरी बदलले तरी,
मराठी बाणा आहे जोपासला,
राज्याच्या मातीत भाषा वृक्ष,
संस्कार खताने आहे रूजवला!