तारांगण
तारांगण
1 min
155
चंद्रा, राहसी नभात का रे?
कधीतरी मनांगणात,
चांदणे तुझे शिंपडून जा,
सवे आण ता-यांनाही,
शुभ्र पैंजण घालून पायी,
रजत थेंबांनी भिजवून जा.....
असंख्य नक्षत्रांची,
आकाशगंगा पसरलेली,
अवकाशाच्या डोहात की
काळोखाच्या गाभा-यात
कुणी पाहिली?...
विचारांचे धूमकेतू...
त्याच गतीने अंतरीक्षातीलही
जातात का?
सूर्याभोवती फिरणारे ग्रह,
खरंच एखाद्याचे भविष्य
अनाकलनीय घडवतात का?
कृष्णविवर! त्यात प्रत्येक जणच
अडकलाय.... नभांगण काय
मनाचे कोंदण काय?
तारांगणाची अनेक रहस्ये,
उलगडतील काय?
खरंच.... आभाळाची खोली काय?