सीता व सोनेरी मृग
सीता व सोनेरी मृग
सीता मागे सोनेरी मृग,
अन रामायण ते घडले,
हरणरूपी मरीचाने पहा,
मोहात तिज कसे पाडले!
तृणभक्षी प्राणी दोन कुळे,
एक सारंग आणि कुरंग,
ठिपकाळलेले विलोभनीय,
शोभे त्वचेस सोन्याचा रंग!
ललनेस हरिणाक्षी उपमा,
निरागस ते, डोळे पाणीदार,
काळवीट चालतो ऐटीत,
शिंगांचे ते विविध प्रकार!
सांबर, चितळ, गोआ, शाऊ,
बारशिंगा, चिंकारा, दरडा,
नावे हरिणकुळांच्या जातीची,
माहिती का नीलगाय, पाडा?
कस्तुरी, मांस, कातडीसाठी,
घात त्यांचा मानव करतात,
तरी शिका-यांपासून स्वतःच्या,
रक्षणास निष्णात असतात!
वा-याच्या वेगाने धावे, पाडस
जवळ येता वाटे उचलावे,
शकुंतलेसही सोबत केली,
अतीप्राचीन याचे वय जाणावे!