STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Classics

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Classics

॥वाहन देवांचे॥

॥वाहन देवांचे॥

1 min
278

गणपतीच्या पुढ्यात खेळतो उंदीरमामा भक्तांना आग्रहाने सांगतो मोदक आणा 

पिंडीसमोर उभा नंदी गार्‍हाणं घालायला करतो बंदी

गार्‍हाणं सांगा माझ्या कानात देवाजवळ निरोप पोचवण्याचा हेतु माझ्या मनात

सरस्वती मोरावर झाली आरुढ विठ्ठल रुक्मिणीसाठी उभा राहीला गरुड 

दत्तगुरुंच्या मागे कामधेनू भजन करा गुरूंचे वाजवुन वेणु 

सिंहाच्या आसनावर बसली दुर्गा पुरणपोळी खाऊ घालुन लाड पुरवा 

कमळावर स्थित लक्ष्मीला हत्ती घालतात स्नान

घराघरात नित्यपुजेचा तिचा मान 

शेषनागावर शय्या विष्णूला सक्ती आधी पुजा वाहनांची, सर्व देवदेवतांची मनापासून भक्ती॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics