कृष्ण
कृष्ण
निळ्याशार सागरात
बघ दिसतो रे कृष्ण
रात्री चंद्रचांदण्यात
गोड हासतो गं कृष्ण !
फुलाफुलाच्या गंधात
मला जाणवतो कृष्ण
निसर्गाच्या सौंदर्यात
मला खुणावतो कृष्ण !
गावागावात जागर
होतो हरे राम कृष्ण
प्रत्येकाच्या हृदयात
वसतो गं राधा कृष्ण !
रोज रामाच्या प्रहरी
माळ कृष्ण कृष्ण कृष्ण
आयुष्याच्या सायंकाळी
जीवा भेटावा गं कृष्ण !