मशागत(अष्टाक्षरी रचना)
मशागत(अष्टाक्षरी रचना)
कधीतरी मनामध्ये
मनाचीच मशागत !
आनंदाचे बी बियाणे
सदा चालावे पेरत !
खोटेखोटेे हे जीवन
नाही तहान भागत
नाही जाणणार कोणी
कोणाचीच कशी गत !
पीक सुपीकसे काही
काही काळामध्ये लागे
सोडा मायेचे तरल
असे मुलायम धागे !
तोंडी बोलाचीच कढी
बोलाचाच चाले भात
रात्रंदिन मनी चाले
मनाचीच मशागत !