Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

दर्शन जोशी

Others

4  

दर्शन जोशी

Others

अभंग - भेटा भगवंता

अभंग - भेटा भगवंता

1 min
604


भेटा भगवंता । दावा विश्वरुप ।

कळावे स्वरुप । मानवासी ।। १।।


कळो आले आज । पिंडी ते ब्रह्मांडी । 

आज हर घडी । समजले ।। २।।


तूच शब्द मूर्ती । शब्दांचे स्वरुप।

पाहता हुरुप । भक्तां आला ।।३।।


घेसी रोज पूजा । इथे सर्वांचीच ।

खूण त्याची तीच । दावितो मी ।। ४।।


रिकामे ते ताट । घेऊनीया ऊभा ।

सांग पद्मनाभा । काय देसी ।।४।।


मागू काय खास । आहे हितगुज ।

वाजे अलगुज । अंतरात ।।५।।


धाव आता देवा । भक्तासाठी आता । 

समर्थ तू दाता । कलियुगी ।। ६ ।।


सुखी व्हावे जन । हेच माझ्या मनी ।

 प्रार्थना जननी । पुरी करी ।।७।।


Rate this content
Log in