हिरवळ
हिरवळ
1 min
206
आसमंती पसरली,
आज नवी हिरवळ !
धुंद मातीचा सुगंध,
त्याचा सुटे दरवळ !
वारा हसतो खुशाल,
ढग धडाड वाजती !
झाडे डोलूनी आनंदे ,
उभी वाऱ्यात नाचती !
वीज हळूच येऊन,
कशी सैराट धावती !
गावातली आई बाई,
घराकडे त्वरे जाती !
डोकावतो इंद्रधनू,
जणू फुलले कमळ !
पुन्हा ओलेत्या मातीचा,
सुटे धुंद दरवळ !