STORYMIRROR

दर्शन जोशी

Classics

4  

दर्शन जोशी

Classics

आला श्रावण श्रावण !

आला श्रावण श्रावण !

1 min
327

सणासुदीचं दाराला

सये लागू दे तोरण  

सुख सौभाग्य घेऊन

आला श्रावण श्रावण !


हृदयात सखे तुझ्या

आज नाचतो श्रावण !

लक्ष्मीच्या तोंडावरी

भरभरून समाधान !


काढ़ दारात रांगोळी

कर सड़ासंमार्जन !

फूल ,बेलाच गं पान

महालक्ष्मीला अर्पण !


कर लहान थोराला

भर भरुन औक्षण !

गोड़ा धोड़ाच ताटात

खीर , लाडू नि पुरण !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics