STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Classics Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Classics Inspirational

॥ अद्वैत ॥

॥ अद्वैत ॥

1 min
299

बंदिवासात वसुदेव देवकीच्या पुत्र जन्मला पोटी

बालरुप त्याचे मनमोहक, मधुर बासरी त्याच्या ओठी


रानीवनी झाडाखाली वाजवितो वेणू

गोठ्यातुन धावत येती वासरे, कामधेनू


वेली लता तल्लीन होती ऐकूनी पावा

डोईवर घागर घेऊनी गोपी म्हणती आला कान्हा, आला कान्हा


ध्यानीमनी घेत होती राधा कानोसा

मनातून ती म्हणत होती अरे माझ्या राजसा


भाव भोळ्या भक्तीने मीरेसमोर धरली दुधाची वाटी

अमृत समजून विष प्याली कृष्णासाठी


प्रेमाचा तो त्याग उमगला नाही कोणाला

रुक्मिणीने सर्वस्व लावले पणाला


गोपगोपी राधा गवळण झाले भक्तीत एकरुप

होईल का रे कृष्णा तुझ्या चरणाशी लीन

राहू दे तुझ्या भक्तीत आम्ही पामरे दीन।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics