श्रावण
श्रावण
हळूवार स्पर्शुनी
तो वारा गेला
कुजबुजत-गुणगुणत
काहीतरी सांगून गेला
बावरी नजर माझी
शोधते फिरुनी त्याला
कुणाच्या येण्याचा तो
निरोप देऊन गेला
त्याच्या येण्याने मनात
श्रावण फुलुनी आला
शांत मनाच्या सागरी
तो हिंदोळत आला
रिम-झिम पावसाची
तो भेट देऊनी गेला
गंध मातीचा तो
सर्वदुर पसरवुन गेला
श्रावणातील त्या धुंद राती
पारिजातकाने दरवळून गेल्या
कोरडया शिवारात, हिरवी
शाल पांघरुन गेला.
