STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Classics Inspirational

गुरूमहिमा

गुरूमहिमा

1 min
234

शब्द अपुरे पडती

गुरू वर्णाया महिमा

मिळे नशिबाने गुरू

होई भाग्य परिक्रमा.


गुरू साक्षात ते ब्रम्ह

ज्ञान भांडार जगती

आज्ञाधारी शिष्य तया

श्रेष्ठ महती बोलती.


देवतुल्य गुरू माना

तया सन्मान करावा

ज्ञान अंगी संपादुनी

मनी आदर असावा.


गुरू वृत्ती ती निःस्वार्थी

सदा ते अर्पिती ज्ञान

स्वतःहुनी ज्ञानी शिष्य

व्हावे तोच अभिमान.


काळ आज बदलला

गुरू नाही ते राहिले

विद्या विकते बाजारी

गुरूशिष्य न पाहिले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics