छत्रपती शिवाजी महाराज (पंचाक्षरी)
छत्रपती शिवाजी महाराज (पंचाक्षरी)
जन्मास आला
तो शिवनेरी
अंश शिवाचा
हो भूमीवरी................
धर्मनिष्ठ तो
क्षत्रिय बाणा
सर्व प्रजेचा
खमक्या राणा..........
मनात स्वप्न
ते स्वराज्याचे
किल्ला तोरणा
हो जिंकण्याचे...........
शिवरायाचे
आम्ही हो भक्त
मर्द मराठा
भगवे रक्त........
करू साजरा
हाच सोहळा
मिळूनी सारे
जन्म आगळा........
राजे जन्मले
जिजाई पोटी
मुजरा असो
कोट्यान कोटी........
