आजची नारी
आजची नारी
कर्तृत्व तिचे खूप मोठे
कोण आहे ती ? तीच ती स्त्री
नाव मात्र तिचे खूपच छोटे
कुटुंबाचा ताठ कणा तीच ती स्त्री.......
आजची स्त्री काळाच्या
ही असे पुढे
वेगवेगळ्या पदावर जाऊन
यशाची पायरी चढे........
वकील असो वा डॉक्टर
संसारच तिचे प्राधान्य
मग का अजूनही ती
सर्व जगास आमान्य.....?
नवे तंत्रज्ञान केले
आता अवगत
कोणत्याही क्षेत्रात
संगणक नित्य हाताळत.......
आता जग बदललंय आजच्या
स्त्रीने-स्वातंत्र्य निवडलंय
दोन्हीही कौशल्याने हाताळतेय
आजची स्त्री नवीन जग साकारतेय....
कधी होतसी तू
रमाई, भिमाई, जिजाई
तुझ्या प्रत्येक यशामागे
ज्योतिबा आणि बाबासाहेबांची पुण्याई.......
हिंदू कोड बिल मुळे वेगळ्या
पदावर जाऊन बसली नारी
आजची नारी खरंच
पुरुषांवर लय भारी...........!
