माझे गाव
माझे गाव
माझे हे आहे सुंदर खेडे गाव,
गावात जायला एवढा मोठा दरवाजा,
त्याला वेस म्हणतात राव.......!
आत गेल्यावर मोठा पिंपळाचा पार लागतो,
अनेकांची झगडे भांडणे येथेच मिटतो,
आम्हाला नाही कोर्टकचेरी ठाव.......!!
लगेच पुढे ग्रामपंचायतीचं ऑफिस,
शंकर पाटील गावाचे सरपंच आहेत,
ते सर्वांशी मिळून मिसळून वागतात भाव......!!!
गावात सातवीपर्यंत शाळा आहे,
प्रत्येक वर्गाला वेगवेगळे शिक्षक आहे,
तिथे नाही जात भेद आणि दुजाभाव......!!!!
गावात एक मोठी जुनी चावडी आहे,
त्याच्या बाजूला एक मोठी बावडी आहे,
तिथेच पाणी पितो आमचं सारं गाव.......!!!!!
गावाला वळसा घालून वाहते सुंदर नदी,
तिला पूर्वीपासूनच म्हणतात पांजरा नदी,
स्फटिका सारखे निर्मळ तिचे जल राव........!!!!!!
तिच्या पाण्याने सारे शेत शिवार हिरवेगार,
तिच्या पाण्यावर पिकवितो पिके आपार,
असे आमचे आदर्श खेडे गाव........!!!!!!
गावात देऊळ एकूण चार,
आम्हाला परमेश्वराचा आधार,
माझे खेडे गावाचे नाव आहे,
*सावरगाव...........!!!!!!
