मासिक पाळी
मासिक पाळी
दिवस होता दिवाळीचा ती
पहाटे लवकर उठली
कशी काय माहित नाही
पण मॅक्सी रक्ताने माखली....
ती घाबरली बावरली
धावत जाऊन ही खबर
मायला सांगितली.......
माय म्हणाली पोरी तू
आता शहाणी झाली......
पोर गोरी असो की काळी
सगळ्यांना येते त्याला
म्हणतात मासिक पाळी.......
सर्व म्हणाले आता तू
घरात नाही फिरायचं....
कशाला ते अजिबात
आता नाही शिवायचं....
आई आता तूच सांग
माझा काय गुन्हा...?
म्हणून माझ्यावर ही पाळी आली.....
काल पर्यंत मी होते
तुमच्या घरची फुल
मंग आज मी अचानक
विटाळ कशी झाली
माझा काय गुन्हा यात...?
अचानक मी तुम्हा
सगळ्यांना परकी कशी झाली.....?
मासिक पाळी येते हे
स्त्री चे वैशिष्ट आहे....
मासिक पाळी येते
म्हणून तिचे मातृत्व
जीवंत आहे.....
कशाला पाळता त्या
रूढी आणि परंपरा
निसर्गाचे अनमोल वरदान आहे
ती आता बिनधास्तपणे
शिवतासावत करा....
बुरसटलेल्या विचारांना
आता नका देऊ थारा
मासिक पाळी मुळे च
स्त्री चे अस्तित्व आहे
म्हणून त्या माता -भगीनीच्या
तुम्ही सन्मान करा.....
अंधश्रद्धेत भरकटलेल्या समाज
माला एक सांगणार का.....?
वाद समजा हवं तर पण
माझ्याशी थोडं भांडणार का.....?
नका घेवू अंधश्रद्धेपोटी
मुलींचा बळी
गुन्हा नाही हा मुलींना येते
मासिक पाळी........
प्रत्येक मुलीचा आहे सन्मान खरा
तुम्ही त्यांच्या जन्माचे स्वागत करा.......
