आम्ही शिवरायांचे भक्त
आम्ही शिवरायांचे भक्त
एक दिवस आली ती सुंदर पहाट,
सगळीकडे शुकशुकाट,
विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट.................
अशा चित्रविचित्र वातावरणात,
भवानी मातेच्या मंदिरात,
शिवनेरी गडात,
जन्मली एक वात..........
जी करणार होती मुघलांचा नायनाट,
मराठ्यांचा सरदार,
हिंदवी स्वराज्याचा आधार,
जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार.......
मंदिरं थरारली,
शिवनेरीची तोफ कडाडली,
वार्याची कोवळी झुळूक,
दऱ्या खोऱ्यात दरवळली...........
नगारा वाजला,
शाहिरी साज चढला,
डंका डोंगराआड,
सांगत सुटला........
आता सह्याद्रीवर,
भगवा फडकणार,
मराठ्यांची तलवार,
शत्रूवर धडकणार..........
इतिहासाचं पहिलं पान शिव,
जन्मान लिहिलं होतं,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त,
स्वराज्याचा इतिहास कोरत होतं.........
अंगात आमच्या सळसळणारं रक्त,
*आम्ही फक्त शिवरायांचे भक्त.........!!!*
