STORYMIRROR

Tejaswini sansare

Fantasy Inspirational

3  

Tejaswini sansare

Fantasy Inspirational

कर्तृत्ववान स्त्री

कर्तृत्ववान स्त्री

1 min
322

ही आई ही आई | दीनदुबळ्यांची ही आई |

मातेस्तव ती गेली बळी | फासावरती आणि सुळी || ध्रु || 


शिवाजीने बांधिले पहिले तोरण | अवघा महाराष्ट्र एक करून | 

दरी कपारी डोंगर सारी फिरून |मावळा केला एक एक निवडून ||


ही आई ~ ही आई ~ शिवरायाची ही आई ||1||


हाताची पसरून झोळी | भवानी दे तलवार बळी ||

भाल्यास भिडवूनी तो भाला |मोगल असो की तो लाला || 

खोगीर घोड्याच्या पाठीला | शिपाई तयार मराठा लढण्याला || 

देशाकरिता जाऊ बळी | संसाराची करूनी होळी ||

 

ही आई ~ ही आई ~ शूर वीराची ही आई ||2||


भगतसिंग तरुण शूरवीर |आईसाठी गेलातो फासावर ||

सुभाषची हिंद सेना झगडे वारंवार | चंद्रशेखरच्या छातीवर गोळीचा मार || 

गुलाम नाकारू भारत मुळी |तुडवू शत्रूला पायदळी ||


ही आई ~ ही आई ~ हुतात्म्यांची ही आई ||3||


शेतकरी असे तो दिन प्राणी |करितो आईची मनधरणी ||

करून नांगरणी आणि पेरणी |पिकून उठते ही खुप धरणी ||

भोगू आम्ही नाना अवकळा | परिना आईचा फसवू गळा ||


ही आई ~ ही आई ~ शेतकऱ्याची ही आई ||4||


आईसाठी उचलू पैजेचा विडा |हाकेला महाराष्ट्र नेहमी खडा ||

इथे हुतात्म्यांची रक्ताचा शिंपला सडा |गोऱ्या सरकारला तो दिला धडा ||

सत्याला लावून गळी |नरकी ना जाओ आमची कुळी ||


ही आई ~ ही आई ~ महाराष्ट्राची ही आई ||5|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy