साथ हवाय
साथ हवाय
काफरलेल्या दिलासाठी
थेंब हवा शांतीचा
थकलेल्या हातासाठी
हात हवाय मैत्रीचा..... 1
अंधारलेल्या डोळ्यांसाठी
फुंकलेला प्राण हवाय
भिजलेल्या ओठांसाठी
प्रकाश सूर्याचा हवाय..... 2
शब्द हवाय प्राणांचा
मोडलेल्या पायांसाठी
कुबडी हवी रस्त्याची
बधीरलेल्या कानासाठी...... 3
हवा एक सांगती
चुकलेल्या मनासाठी
मदतीचा हात हवाय
भ्रष्ट झालेल्या आत्म्यासाठी...... 4

