STORYMIRROR

Tejaswini sansare

Romance Others

3  

Tejaswini sansare

Romance Others

आता जाऊ द्या मला गावाला (लावणी

आता जाऊ द्या मला गावाला (लावणी

1 min
228

आता जाऊ द्या मला गावाला, हटकन लावू नका ||

ओढू नका तुम्ही ओढू नका, पदराला ओढू नका || ध्रु ||

असं पदराला हो धरताय किती |

 मला वाटते मनात भीती |

 धडधड उरात माझ्या करतय |

गुपित बोलू नका ||1||

तुम्ही शाहीर महाराष्ट्राच |

नावराखाया कोल्हापूरचं |

मला जाऊ द्या माझ्या मुलंखाला |

वेळ घालवू नका ||2||

पूर आलाय प्रेम नदीला |

घे न्याऊनी त्यात स्वतःला |

 दुनियादारी भिऊन सख्या |

संधी गमवू नका ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance