मी गेले
मी गेले
वाट वेदनांची तुडवीत मी गेले
काटे ठोकरीने उडवीत मी गेले......
पिके माणुसकीची उगवित मी गेले
भावना उरातल्या लपवीत मी गेले.....
प्रेमसडा काळजातला शिंपीत मी गेले
माणसे माणसांत गुंफीत मी गेले......
वाटेतल्या कळ्यांना फुलवीत मी गेले
ओल्या पापण्यांना सुकवित मी गेले......
चिता माझ्या चिंतेची पेटवीत मी गेले
आयुष्याच्या शेवटी जीवन संपवीत मी गेले......
