STORYMIRROR

UNNATI FILMS ENTERPRISES

Inspirational

4  

UNNATI FILMS ENTERPRISES

Inspirational

प्रवास जीवनाचा...

प्रवास जीवनाचा...

1 min
1.0K

धावतो कशाला रोज तू,

धावतो सुखाच्या मागे रे,

सोडून बघ ध्यास त्याचा,

धावेल सुख मागे मागे रे..१..


कोणाला मिळाले वेळेपूर्वी,

नशीबापेक्षाही जास्त रे,

देव देतो पोटापुरतेच पण,

आहेच तेच तर रास्त रे..२..


नुसती धावपळ येथे तेथे,

सोनेरी हरीण तेच रे,

नको रे उचलू कष्टाविना,

घामाचे मोतीच वेच रे..३..


दूर बघ तू आकाश-धरणी,

झाली एकच भासते रे,

जागा हो तू स्वप्नांमधूनी,

स्वप्न स्वप्नच असते रे..४..


कष्टाची भाकरी खावून बघ,

पुरणाची चव असते रे,

मिळाली झोपडी राहून बघ,

ती ताजमहाल दिसते रे..५..


जगात नाही झाला आजवर,

कोणीही खराच सुखी रे,

धन-दौलत सर्वच असून ही,

सारेच आहेत दु:खी रे...६..


धन-दौलत भानगड सोड तू,

लागेल झोप रोज रोज रे,

मनाला चाचपून बघ तुझ्या,

तूच खरा राजा भोज रे...७..


मनात ठेव तू भाव जरासा,

सत्याची ठेव जरा जाण रे,

क्षणभंगुर हे जीवन आहे,

जायचे तुलाही ठेव भान रे..८..


संगी-सोबती येथेच सुटणार,

उघडे कर स्वर्गाचे दार रे,

अर्थीला शेवटी धरण्यासाठी,

माणसे असावित चार रे..९..


सोडून जातील नाते सगळे,

शेवटचे स्थानक घाट रे,

प्रवास संपेल या घाटावरच,

संपेल जीवनाची वाट रे..१०..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational