निवडले होते प्रेम
निवडले होते प्रेम
1 min
190
शोधीत होतो तिलाच मी
वाटेवरती जीवनाच्या
आली मात्र आली शेवटी
शय्येवरती मरणाच्या....१
तोच सूट व तीच ओढनी,
अंगावरती आज तीचे,
दिली होती पुर्वी पण आज
स्वप्न साकार केले माझे....२
जातो आहे दूर दूर मी पण,
नाही दुःख नाही पिडा,
सजुन आली अंतिम क्षणी,
जिच्यासाठी होतो वेडा.....३
पहिला दिवस पहिला क्षण,
पारणेफिटले नयनांचे,
दुःख नाही जरी आज मला,
जिवनच ठरले स्वाप्नांचे....४
वाटले जन्म मी पुन्हा घ्यावा
तिच्याचसाठी यावे पुन्हा,
आजच संपले विरह जगणे,
काही नव्हता माझा गुन्हा....५
अडीच अक्षरच मराठीतील,
निवडले होते प्रेम,
आज आली नशिबी माझेे,
फोटोसाठी ची फ्रेम...६
