न्यूनता....!
न्यूनता....!
न्यूनता मनात
घर करून राहते
समाजात
चार हात दूर ठेवते...
शिक्षितापुढे
निरक्षर न्यून होतो
श्रीमंतापुढे
गरीब न्यून होतो...
चूक की बरोबर
देव जाणे
पण ही न्यूनता
हळू हळू पोखरते...
न घाबरता आता
न्यूनतेतून बाहेर या
न्यूनतेवर मात करून
समाजात सामील व्हा...
गरीब-श्रीमंत
आता फरक मनात आणू नका
शिक्षत-अशिक्षित
याचा बाऊ करू नका...
तो ही माणूस मी ही माणूस
इतकेच आता मनी धरा
सारे विसरून पुढे पुढे
जाण्याचा प्रयत्न करा...
चूक-भूल सारे
खर्ची घालून विसरून जा
यशासाठी
प्रयत्नांची कास धरून पुढे चला...
एक दिवस असा येईल
हवं ते सारं देईल
प्रयत्नांचे सोने होईल
सारे दुर्भाग्य सौभाग्य होईल....!
