STORYMIRROR

Kanchan Thorat

Romance Classics

3  

Kanchan Thorat

Romance Classics

अबोल प्रीत

अबोल प्रीत

1 min
259

एक होती अबोली

साधी सुधी बिचारी

ना गंध... ना साज...

ना कधी, काही आवाज।


रोजच फुलायची,

कोमेजून जायची;

मोगऱ्यासाठी...

 मनोमन झुरायची ।


मोगराही फुलायचा ;

मनोमन झुरायचा .

अबोलीच्या रंगासाठी ,

आसमंती गंधायचा।


दोघांचीही प्रीती ,

होती खरीखुरी....

अबोली अबोल,

मोगरा टपोर..!


पाहुनी प्रीती

देवी हरखली....

देव झाला माळी....

त्याने गुंफली जोडी...!


गुंफले देवाने

मोगरा अबोली..

बहरली प्रीती...

गजऱ्यात ...!!!😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance