मृदगंध
मृदगंध
1 min
247
दाटलेल्या नभाने ठरवले,
आता आपण बरसायचे,
का म्हणून आता आपण,
साठुन असे राहायचे?
रिते होऊयात आता,
खूप झाला भार आता,
जंगलातही वनवा आता,
लागला भडकायला...!
पाखरे सारी दुःखाची,
उडवून आता द्यायची,
आहे मृदगंध आता ,
आसमंती उधळायचा...!
