प्रेम
प्रेम
आज या संध्यासमयी,
हात हाती हा तुझा.
बोलतो हा गार वारा,
प्रीत कथा माझ्या तुझ्या...
लवलववती वेल कोवळी,
गात प्रीती गीत आता.
डोळ्यांत बघ दाटली किती,
पर्ण फुली प्रीत छटा,
आज भासले हे किनारे,
रिक्त पण भारलेले
प्रेम वारे वाहिले अन्
रिक्त मन हे झाले....
तूच अन् मीच आता
या इथं आहोत ना.
का मग सांग लाजते
प्रीत मनातील भावना.
या हातांत हात गुंफला
क्षणाक्षणाला श्वास गुंतला.
तुझ्यात माझा जीव गुंतला,
आज या.... संध्यासमयी ...

