STORYMIRROR

Kanchan Thorat

Others

4.3  

Kanchan Thorat

Others

आयुष्याचे इंद्रधनुष्य

आयुष्याचे इंद्रधनुष्य

1 min
316


आयुष्याच्या इंद्रधनुचे

रंग त्याचे नाना परीचे

रंग काळा दुःखाचा अन्

रंग गुलाबी प्रेमाचा...!


रंग पिवळा मैत्रीचा,

रंग पांढरा शांतीचा,

 रंग तांबडा रागाचा ,

द्वेषाचा अन मत्सराचा ...!


रंग केशरी त्यागाचा,

अध्यात्माचा अन ज्ञानाचा.

रंग हिरवा वसुंधरेचा,

वृद्धीचा अन् समृद्धीचा...!


 रंग निळा आभाळाचा ,

अथांंग अशा सागराचा,

तसाच तो निळ्या हरिचा ,

अंतरातल्या् पोकळीचा...!


रंगबिरंगी इंद्रधनूने

आयुष्य आहे सजले धजले...

प्रत्येक रंग त्याच्या जागी,

खुलवतो आपल्या जगण्याचा रंग ...!


Rate this content
Log in