STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Romance Tragedy

3  

Kanchan Thorat

Abstract Romance Tragedy

जगावेगळी  प्रीत

जगावेगळी  प्रीत

1 min
175

या कातरवेळी सूर्य हा पुन्हा एकदा रुसला

रुसला जरी लाल गुलाबी चेहरा त्याचा दिसला


हसला नाही...कातरवेळी डाव साधला मोठा,

धरणीला विरहात सोडून पुन्हा दडून बसला


असला कसला नखरा त्याचा न कळे तिजला

रोज सकाळी येणारा साजन हा दुखरा...!


खुलवी सकाळी, तिची कलिका उधळूनी साज

दिले तयाने तिजला सारे सुवर्णालंकार


वेडा कुठला प्रीत न जाणे.. करी उधळण सोन्याची

त्याच्या असल्या प्रेमाने लाही होई तिची


तरी बिचारी प्रेमापोटी साहे त्याचे सारे जुलुम

नकळत तिला दुखावून...पुनः तोच राही अबोल


सोसवेना आता तिजला कातरवेळीचा निरोप

पुन्हा येईल संध्या आणि पुन्हा मिट्ट रात


धरणी अन सूर्याची आहे असली जगावेगळी प्रीत..

कातरवेळ अन विरहाची अशीच पडली रीत...।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract