वन महोत्सव
वन महोत्सव
झाड बहरले, फुल हासले,
पानाफुलांसह चिंब भिजले.
गर्द हिरवी ,वनराई ही,
डोंगर हिरवे ,रानेही हिरवी.
नदीकिनारेही हिरवीच हिरवी,
नटून धरा ही शालू नेसली.
पाऊस आला ,पाऊस आला,
निसर्गराजा, खुलला खुलला...
खुलली धरा, निसर्ग खुलला,
वन महोत्सव ...आला रे आला!
