STORYMIRROR

Kanchan Thorat

Tragedy Others

3  

Kanchan Thorat

Tragedy Others

काव्यधारा

काव्यधारा

1 min
199

मीच माझी मंजुळ गाणी, 

विराणीत या गुंफली. 


मोडलेल्या स्वप्नांची, 

काडी न् काडी जाळली. 


अमृताचे कलश सारे, 

पालते व्याधी वरी..... 


ना तरी वेदना माझी, 

नाममात्र शमली. 


अघोरी ही जादू सारी, 

भोवर्यात आहे फसली...! 


ऐरणीवर ठेऊन काळीज, 

घाव आहेत घातले ;


काळजाचा तुकडान् तुकडा, 

आज आहे दुखावला...! 


रक्तधारा ना आता, 

त्यातून 'काव्यधारा' वाहिल्या...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy