STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Inspirational Others

4.0  

Kanchan Thorat

Abstract Inspirational Others

माणूस

माणूस

1 min
244

ती माणूस म्हणून जगू म्हणते

थोडं आकाशात उडू म्हणते

थोडं पाण्यामध्ये पोहू बघते

कुणाला काय दिक्कत आहे?


केवढं विस्तीर्ण आकाश हे...!

अस असताना सारं....

 कशाला ओढायचे पाय तिचे?

कशाला छाटायचे पंख ,आनंदी मनाचे ?


अगदी पंखांना तिच्या बळ दे,

असं मी नाही म्हणत,

अगदी हात पकडून सारे शिकव

असही ,मी नाही म्हणत


काहीच नको तिला, तुझ्याकडून

बस... थोडी उसंत दे !

तिच्या वाटणीचा तिला,

जरा ...मोकळा श्वास दे


स्वातंत्र्याची मक्तेदारी

एकट्याची नाहीच रे तुझी

 का वाटावं तुला असं

केवढं मोठं अज्ञान हे...!


 दूर सार डोळ्यांवरची झापडं,

 संस्कृती अन परंपरेने जी बांधली

 माणूस म्हणून जगण्याची मजा,

 जरा तिलाही घेऊ दे....!


ती माणूस म्हणून जगू म्हणते

थोडं आकाशात उडू म्हणते

थोडं पाण्यामध्ये पोहू बघते

कुणाला काय दिक्कत आहे?



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract