STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Others

3  

Kanchan Thorat

Abstract Others

कवितेच्या शोधात....

कवितेच्या शोधात....

1 min
241

तलम मऊशार गवतावरून,

 पाऊले टाकले मी.

 झुडपांच्या अच्छादनावरुनी ,

अलगद चालले मी .

खाचखळग्यांच्या वाटेवर ,

अडखळले ही कधी कधी.

 झुळझुळणार्‍या पाण्यासवे ,

तालही धरला कधीमधी.

 डोंगरदऱ्यातून चढले, उतरले,

 आणि घसरले ही कित्येकदा.

जपून पावले टाकीत होते,

 निसरणाऱ्या वाटेवर मी.

 चिखललेल्या वाटांना ,

आवर्जून चुकवत होते.

 काळ्याशार रस्त्याने ,

सैरभैरही झाले मी.

पायवाटेने चालले मी ,

मनसोक्त ...मनमुराद.

 चौकामध्ये गांगरलेही,

 कोणती निवडू आता वाट?

 पावसामध्ये छत्री विना,

 भिजलेही बऱ्याचदा .

असून छत्री कधीकधी,

झालाच उपयोग असेही नाही.

घरच्या हिरवळीत रांगले,

बिनधास्त ...बिनदिक्कत .

झपझप पावले टाकले मी ,

तापलेल्या हमरस्त्यात .

कितीदा तरी कोसळले मी ,

ज्ञात-अज्ञात कड्यांवरून .

सप्तपदी ही चालले मी,

 आनंदाच्या या डोहात.

 आयुष्याच्या या वाटांवर,

 सुखदुःखांच्या या लाटांवर ,

नजर कायम भिरभिरते माझी

कवितेच्या शोधात.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract